top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

स्व. गुरुवर्य डी.डी.आसगावकर यांच्या 14 व्या स्मृतिदिना निमित्यआयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला ...

स्व. गुरुवर्य डी.डी.आसगावकर यांच्या 14 व्या स्मृतिदिना निमित्य आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिलो.

आदरणीय आसगावकर साहेब यांचा जीवनप्रवास जर आपण पाहिला तर एखादे ध्येय समोर ठेऊन आपण प्रामाणिकपणे काम केले तर नक्कीच समाजाच्या हिताचे काम आपण करू शकतो, हे यातून दिसून येते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आणि ते पुढे जाऊन आपल्या आयुष्यात यशस्वी झाले. त्यामुळे अनेक कुटुंब उभी राहिली. मनात आणले असते तर त्या काळी आसगावकर साहेब यांना Govt job हा नक्की मिळाला असता, पण ज्या मातीत आपण जन्मलो, त्या मातीसाठी आपण भरीव योगदान द्यावे, यासाठी पुन्हा सांगरुळला परत येऊन शिक्षण संस्थेत नोकरी स्वीकारली. याबरोबर त्यांनी संस्थेचा विस्तार केला आणि 16 शाखा स्थापन केल्या. या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत शिक्षण नेण्याचे मोठे काम त्यांनी केले.

त्यांचे हे काम आजच्या काळात आमच्या सारख्या तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. आसगावकर साहेबांनी आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम केले. आणि हीच परंपरा आमदार जयंत आसगावकर यांनी पुढे जपली.

आज आसगावकर साहेब यांच्या स्मृतीदिनि आपण विविध क्षेत्रातील ज्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवले गेले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. एवढे मोठे काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या नावे पुरस्कार मिळणे हे भाग्याचे असते. त्यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, हे सुद्धा मला आवर्जून नमूद करावे वाटते.

- आ. ऋतुराज पाटील



11 views0 comments
bottom of page