top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

श्री राम सोसायटीने कोल्हापूरमहानगरपालिकेच्या सहकार्याने उभारण्यातआलेल्या १६२ बेड क्षमतेच्या कोविड...

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावडा येथे श्री राम सोसायटीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या १६२ बेड क्षमतेच्या कोविड अलगीकरण सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

या सेंटरमध्ये महिलांसाठी 50 आणि पुरूषांसाठी 112 अशा एकूण 162 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कसबा बावडा येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील अनेक रुग्णांना अत्यंत चांगली सुविधा दिली जात आहे.

परंतु, गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, बऱ्याच लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने हे रुग्ण घरातच राहून उपचार घेण्याकडे प्राधान्य देत आहेत. परंतु, घरी अलगीकरणाची पुरेशी सोय नसल्याने कळत नकळत संपर्कात आल्यामुळे घरातील अन्य लोकांना संसर्ग होत आहे. यामुळे काही ठिकाणी कुटुंबातील अनेक लोक बाधित झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर हे अलगीकरण सेंटर सुरु करण्यात आले आहे.

कोल्हापूरकरांना माझी कळकळीची विनंती आहे, कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच तात्काळ कोरोना चाचणी करून त्वरित कोरोना सेंटर किंवा रुग्णालयात दाखल व्हावे. आणि ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांनी या सेंटरमध्ये येऊन उपचार घ्यावेत. जेणेकरून आपल्या घरातील इतर सर्व लोक सुरक्षित राहू शकतील.

असे सौम्य लक्षणे असणारी सर्व रुग्ण या केंद्रांमध्ये यावेत यासाठी कसबा बावडा येथील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मंडळाचा एक कार्यकर्ता घेऊन सोसायटीचे संचालकांकडून यांनी "गल्ली समिती" स्थापन करण्यात येणार असून कसबा बावडा परिसर कोरोनामुक्त करण्याठी प्रत्येक गल्लीतील नागरिकांचे प्रबोधन करण्याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी, आ. चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, श्री राम संस्थेचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, सेंटर समन्वयक गजानन बेडेकर, महापालिका उपअभियंता हर्षजित घाटगे, यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी, आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



4 views0 comments
bottom of page