top of page

राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नव्याने सुरूकरण्यातआलेल्या'अर्जुन जिमखाना'...

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 28, 2021
  • 1 min read

आज राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'अर्जुन जिमखाना'चे उदघाटन करण्यात आले.

आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे त्याप्रमाणे डॉक्टरांनाही आपले चांगले आरोग्य ठेवण्यासाठी जिमची नितांत गरज आहे. त्यानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अर्जुन जिमखाना सुरु करण्यात आला आहे. हा नक्कीच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीत डॉक्टरांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करावे लागते. त्यासाठी चांगले आरोग्य असणे गरजेचे असते. त्यामुळे, या जिमसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही या विभागाचा आमदार म्हणून यावेळी दिली.

यावेळी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस एस मोरे, शाहू स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष केतन ठाकूर, डॉ. सुधीर सरवदे, डॉ. सुदेश गंधम, डॉ. सनी खंदारे, डॉ. निखिल जगताप, डॉ. दुर्गाशंकर दुर्गावले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉक्टर्स उपस्थित होते.



 
 
 

Commentaires


bottom of page