top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

कोल्हापुरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, ग्रामविकासमंत्री...

कोल्हापुरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी व सहकारी यांच्यासोबत विडिओ कॉन्फरसिंग द्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मी खालील मुद्दे मांडले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अतिगंभीर आणि अधिक घातक आहे. राज्य शासनानेतर्फे लागू करण्यात आलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात मदत झाली असली तरी अजून रुग्ण वाढू नये यासाठी आता यापुढील पाऊल उचलणे आवश्यक वाटते आज या बैठकीमध्ये, या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधी त्यांची मते मांडली असून याबाबत सविस्तर विचार करून लॉकडाऊनबद्दल लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. कोल्हापूरला कोरोनामुक्त करण्यासाठी एकत्रितपणे ही लढाई लढणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील पूर्वी सुरु असलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करावेत. तसेच, प्रत्येक लोकप्रतिधींनी तालुकास्तरीय कोविड केयर सेंटर सुरु करावेत जेणेकरून उपलब्ध रुग्णालयांवर ताण येणार नाही. काही अहवालांप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट ही लहान बालकांसाठी अधिक बाधक ठरणार असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा एक टास्क फोर्स स्थापन करून बालकांना जपण्यासाठी अत्यंत सुसज्ज व्यवस्था तयार कराव्यात. १८ ते ४५ वयोगातील नागरिकांना स्लॉट बुकिंग करण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, सदर अप्लिकेशन ही केंद्र सरकारचे असल्याने राज्य सरकारचे वेगळे अप्लिकेशन करून आवश्यक लसींची उपलबद्धता लवकर करून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थतीचा सविस्तर आढावा घेतला असून योग्य उपायोजना करण्याच्या सूचना मा. मंत्रीमहोदय आणि सर्वच लोकप्रतिनिधींनी दिल्या आहेत. माझी सर्वच कोल्हापूरकरांना कळकळीची विनंती आहे, सध्याचे गांभीर्य ओळखून कृपया कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि लक्षणे आढळतेच कोरोना चाचणी करून घ्या. लवकर निदान, लवकर उपचार या सूत्राचे पालन करूया. - आ. ऋतुराज पाटील



6 views0 comments
bottom of page