top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

एक महिन्यापूर्वी म्हणजे ०३ जानेवारी, २०२१ रोजी रु. ५० लाख निधीतून जवाहरनगर येथे उभारलेल्या ...

एक महिन्यापूर्वी म्हणजे ०३ जानेवारी, २०२१ रोजी रु. ५० लाख निधीतून जवाहरनगर येथे उभारलेल्या सिरत मोहल्ला मदरसा भवन हॉलचा उदघाटन समारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब आणि प्रसिद्ध उर्दू शायर इम्रान प्रताप गढीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.

आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना UPSC/MPSC ची तयारी करण्यासाठी या हॉलचे दोन्ही मजले तयार करण्यात आले आहेत. या हॉल मध्ये मुलींसाठी कॅम्पुटर प्रशिक्षण देण्याचा विषय त्या कार्यक्रमात मांडला गेला होता. आणि त्यानुसार आज भागातील मुस्लिम समाजातील मुलींच्या प्रशिक्षणासाठी १० कॅम्पुटर उपलब्ध करून देत असतांना मला मनोमन आनंद होत आहे.

सध्याच्या टेकनॉलॉजि जगामध्ये सातत्याने बदल होत आहेत. एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या जवळ आले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपल्याला हवी ती माहिती तात्काळ मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला कॅम्पुटर ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. आणि आज भागातील मुस्लिम समाजातील मुलींसाठी पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण ही सुविधा देत असल्याचे समाधान आहे.

आगामी काळामध्येसुद्धा कोल्हापुरातील मुला-मुलींना अशा आवश्यक प्रशिक्षण सुविधा मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.

यावेळी, माजी उपमहापौर भूपाल शेटे, सिद्दीकभाई कच्छी, जाफर मोमीन, शेख चाचा, दिलीप भुर्के, इम्तियाज बाबा, विजय पाटील, जगमोहन भुर्के, प्रसन्न वैद्य, संदीप गायकवाड, जावेद सय्यद, रियाज बागवान, जमीर सय्यद आलम मुजावर, भूषण वैद्य तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



1 view0 comments
bottom of page