आज आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस. गेली ३३ वर्षे अनेक चढउतार बघत एकमेकांना भक्कम साथ दिली आहे. या दोघांचे बॉंडिंग, एकमेकांबद्दल असलेला आदर, सन्मान आम्ही लहानपणासून अनुभवत आलो आहे.
बाबांनी वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षण संस्थेसाठी काम सुरू केले. अनेक अडचणींना तोंड देत डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपची जबाबदारी सांभाळत असताना आई नेहमीच सावलीसारख्या त्यांच्या सोबत राहिल्या. पाठबळ देत राहिल्या. तुम्ही पुढे चला, मी सोबत आहे, हा आधार देत राहिल्या.
कोणताही निर्णय घेता असताना एकमेकांचे मत विचारात घेऊन, त्याचा आदर करून आजवरचे निर्णय त्यांनी घेतले. आई-बाबांच्या या नात्याने आमच्यावर संस्कार केले आहेत.
आई-बाबा तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
Comments