top of page
Search

९ फेब्रवारी, २०१९ रोजी घरच्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली.

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस.

९ फेब्रवारी, २०१९ रोजी घरच्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली. लग्नानंतर पूजाला पुरेसा वेळ देणे महत्वाचे होते, पण लग्नानंतर लगेचच विधानसभेची लगबग चालू झाली. त्यामुळे, लग्नानंतर फार कमी वेळ पूजाला देता आला.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, याचा प्रत्यय मला सातत्याने येत होता. निवडणुकीच्या प्रचारामुळे सकाळी ६ ला बाहेर पडले कि रात्री घरी यायला खूपच उशीर व्हायाचा. पण त्यावेळी सुद्धा आणि आताही “तुम्ही काम करत राहा, मी सर्व पाहते” हा एक शब्द मला निर्धास्तपणे बाहेर पडून कोल्हापुरातील लोकांचे प्रश्न सोडविणाची ताकद देत राहतो.

'अर्जुन'चा जन्म हा आमच्या परिवारासाठी एक अविस्मरणीय गिफ्ट आहे. त्याच्या येण्याने जणू घरामध्ये एक नवा उत्साहच आला आहे. आताही अर्जुनसाठी मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या कामामुळे कधी कधी पूजाच आई आणि बाबा बनून त्याचे संगोपन करत आहे. राजकारण आणि समाजकारण करत असताना मला पूजाची साथ खूप मोलाची ठरत आहे.तिचे पाठबळ मला नव्या गोष्टी करण्यासाठी महत्वाचे ठरते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पूजा!1 view0 comments
bottom of page