मी गेली महिनाभरापासून दक्षिण मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन प्रत्येकाशी चर्चा करत आहे. यामध्ये युवक-युवती, ज्येष्ठनागरीक, शेतकरी-व्यापारी बंधू भगिनी, गृहिणी सर्वांनीच या संपर्क दौऱ्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. याच दौऱ्यातील पुढचा भाग म्हणून तामगांव गावामध्ये आज संपर्क दौरा केला.
या सर्व दौऱ्यांमधून मी कोल्हापूर दक्षिणच्या नागरिकांच्या अडचणी आणि सूचना व्हिजन दक्षिण या माध्यमातून अधिक व्यापक पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये, अनेक जणांनी मला वेगवेगळ्या सूचना केल्या, पण यामध्ये मला प्रामुख्याने आणि महत्वाची वाटलेली सूचना ती म्हणजे रोजगार निर्मितीची.
त्यामुळेच, आगामी काळात मी प्रामुख्याने कोल्हापुरातच रोजगार निर्मिती कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील आणि कटिबद्ध राहणार आहे. जास्तीतजास्त नोकऱ्या कोल्हापुरातच उपलब्ध करून कोल्हापूरातून होणाऱ्या ब्रेनड्रेनला थांबविण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे.
- ऋतुराज पाटील
Comments