top of page
Search

हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या आपल्या कोल्हापूरला जिल्ह्याला...

हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या आपल्या कोल्हापूरला जिल्ह्याला देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडण्याकरीता अद्ययावत 'कोल्हापूर विमानतळ' उभे करण्यासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत.

दक्षिण भारतातील तिरूपती, बंगळूरू, हैद्राबाद तसेच मुंबई नंतर आता अहमदाबादलाही कोल्हापूरातून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आज या मार्गावरील पहिले विमान कोल्हापूर विमानतळावर उतरले. या विमानाच्या स्वागताला मी आवर्जून उपस्थित राहिलो.

सन्माननीय पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग कामे, धावपट्टी विस्तारीकरण अशा विविध काम प्रगतीपथावर आहेत. लवकरच ही सर्व कामे पूर्ण करून कोल्हापूरकरांसाठी एक अद्ययावत विमानतळ उभे करू असा विश्वास आहे.

या सर्व प्रक्रियेमध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील, ना. हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया या सर्वांचे व विशेषतः एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंह यांचे विशेष सहकार्य लाभले आहेत.

- आमदार ॠतुराज पाटील0 views0 comments
bottom of page