आज पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या तीन ग्रामपंचायतींसाठी पाचगाव येथे स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. तसेच 63 ठिकाणी 147 कॅमेरे बसविण्यात आले. कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघ सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,करवीर डीवायएसपी प्रशांत अमृतकर , पोलीस निरीक्षक सुनील पाटील , पाचगावचे सरपंच संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. - आमदार ऋतुराज पाटील
Comments