Search

संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन..

संवेदना फाऊंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर प्रकाश टाकत समाजप्रबोधन करणाऱ्या 'ट्राफिक ट्राफिक' लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

हा लघुपट पाहत असतांना आपल्या कोल्हापूरकरांची सामाजिक संवेदना किती प्रगल्भ आहे, याची जाणीव झाली. या लघुपटाचे दिग्दर्शक, कलाकार आणि ज्या सर्वांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे मी मनापासून कौतुक करतो.

एखादे शहर मोठे होत असताना, विकसित होत असतांना रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढते आणि त्याबरोबर ट्राफिकची समस्या सुद्धा निर्माण होते. हे वाढणारे ट्राफिक नियंत्रित करण्यासाठी प्रशासनसोबतच प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसादसुद्धा तितकाच महत्वाचा आहे.

RTO सारखे विभाग रस्ते सुरक्षा आठवडा साजरा करतात, परंतु याबाबत लोकांच्यामध्ये जागृततेमध्ये सातत्य राहताना दिसत नाही.आणि अशाच परिस्थितीमध्ये संवेदना फाऊंडेशन सारख्या संस्थांचे काम महत्वाचे ठरते.

संवेदनाच्या टीमने संपूर्ण कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर परावर्तक (reflector) लावण्याचे काम कित्येक दिवस केले. 'ट्राफिक ट्राफिक' या एकांकिका मधून अनेक ठिकाणी जनजागृतीचे काम केले आणि या माध्यमातून ट्राफिक जनजागृतीसाठीचे पुढचे पाऊल टाकले आहे. संवेदनाचे हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

कोल्हापुरातील या वाढत्या ट्राफिकला शिस्त लावण्यासाठी आम्ही, पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून शहरात अनेक प्रमुख ठिकाणी ट्राफिक सिग्नल कार्यन्वित करण्यात आले असून ते synchronize पद्धतीने सुरु आहेत. पण, याला जोड हवी ती जनजागृतीची.

शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींमध्ये या बाबतची जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी संवेदना फाऊंडेशनने भविष्य काळात जोमाने काम करावे, तरुण आमदार म्हणून त्यांच्या सर्व उपक्रमांना माझे नक्की सहकार्य राहील.

यावेळी, कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस, सौ, स्नेहल गिरी, श्री. माळी, संवेदनाचे अध्यक्ष संजय कात्रे, उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, सुहास नाईक, ऋषिकेश जाधव, शिरीष पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments