सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व ...
- Nilesh Patil
- Jun 26, 2021
- 1 min read
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोल्हापूरमध्ये सारथी संस्थेच्या या उपकेंद्राचे स्वप्न साकार होत आहे. अत्यंत कमी वेळामध्ये हे उपक्रेंद्र सुरु करण्याचे योग्य नियोजन केल्याबद्दल मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी आणि पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटीलजी या दोघांचेही मनापासून आभार. या उपकेंद्रांमुळे मराठा समाजातील होतकरू, अभ्यासू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा आधार मिळणार आहे.
Comments