कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मी विजयी झालो. यामध्ये माझ्यासाठी काम करणाऱ्या अनेक लोकांचा समावेश होता. अनेकांचे आशीर्वाद मला मिळाले. सम्राटनगर परीसरातील मालती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ.भारती भीमराव वाझे आज्जी ( वय 77 वर्षे ) यांचाही माझ्या विजयात वाटा आहे. महापालिकेच्या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या आहेत. त्यांची काँग्रेस विचारांवर श्रद्धा आहे आणि आमच्या कुटुंबावर विशेष प्रेम आहे. विधानसभा मतदानाअगोदर अचानक त्यांना पॅरॅलीसिस झाला. काही दिवस डॉक्टरांच्याकडून उपचार घेऊन त्या घरी आल्या. मतदानादिवशी त्यांनी काहीही झाले तरी मी मतदान करणारच असा आग्रह धरला होता. पण त्यांना उठता येत नव्हते. या परिसरातील आमचे कार्यकर्ते सुरेश ढोणूक्षे (सर) यांनी ही परिस्थिती ओळखून वाझे आज्जीना ऍम्ब्युलन्स मधून मतदानासाठी नेले. आज या वाझे आज्जीना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांना झालेला आनंद पाहून मी गहिवरून गेलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. पण माझ्याबरोबर एक सेल्फी घे, असा प्रेमळ हट्ट त्यांनी केला. आणि मी माझ्या कायम लक्षात राहणारा वाझे आजींसोबत हा 'विशेष सेल्फी' घेतला.
top of page
bottom of page
Comments