संभाजीनगर प्रभागामध्ये सहकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रचंड उत्साहात पदयात्रा संपन्न झाली.
- Nilesh Patil
- Oct 11, 2019
- 1 min read

आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संभाजीनगर प्रभागामध्ये सहकाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रचंड उत्साहात पदयात्रा संपन्न झाली.आज कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. पण, आता निवडणूक अगदी 10 दिवसांवर आल्यामुळे मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांना पोहचनेही तितकेच गरजेचे आहे.त्यामुळे, आज ढगाळ वातावरणातच प्रचार दौरा सुरू केला. पण, संध्याकाळी संभाजीनगर येथे पदयात्रा चालू असतांनाच मोठ्याने पाऊस चालू झाला त्यामुळे लाईटही गेली. पण, माझ्या सर्व जेष्ठ-तरुण सहकार्यांनी मोबाईलची टॉर्च लावून भर पावसात पदयात्रा पूर्वीपेक्षा जास्त उत्साहात पदयात्रा पूर्ण केली. असं म्हणतात की कोणताही माणूस मोठा होत असतो त्यावेळी, त्याच्या पाठीमागे हजारो हात असतात. माझे हे हात म्हणजे माझे मित्र-मैत्रिणी तसेच
माझे हे जिवाभावाचे सहकारी आहेत.आम्ही सर्वचजण कोल्हापूर दक्षिण च्या विकासाचे व्हिजन घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहोत. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतचे सर्वांचे प्रश्न सोडविणे हेच आमचे लक्ष ठेऊन आम्ही काम करत आहोत.
- ऋतुराज पाटील
댓글