पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडेवाडी जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, ग्रामपंचायत सांगवडेवाडी, विकास सेवा सोसायटी, दूध संस्था व लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त कोरोना काळजी केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गावातच उपचार करता यावेत यासाठी कोरोना काळजी केंद्र उभारण्यात येत आहेत.
यावेळी, गट विकास अधिकारी जयवंत उगले, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, विजय पाटील,कुमार खुडे,मुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी आर.एन.मुल्ला,सरपंच वैशाली कलकुटकी,उपसरपंच शीतल बाबासो खोत, ग्रामसेवक रमेश कारंडे,तलाठी बी.ए. रामांण्णा, डॉ. संदीप खोत, आरोग्यसेवक राजेंद्र व्होटकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments