top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

सागर राणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Updated: May 11, 2021

सागर राणे, माझे काका आदरणीय सतेज (बंटी) पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक. गेली 20 वर्षांहून अधिक काळ सागर बंटी काकांच्या सावली प्रमाणे त्यांच्या सोबत काम करत आहे.

सकाळी लवकर सागरचे काकांसोबतचे काम सुरू होते ते रात्री कधी संपेल याचा नियम नाही. आलेल्या प्रत्येक फोनची दखल घेत प्रत्येकाला नीट व्यवस्थित निरोप देणे, कामाचे स्वरूप आणि काकांची उपलब्धता बघून भेटणाऱ्याना योग्य वेळ देणे, लोकांचे म्हणणे साहेबांपर्यंत पोहचवणे आदी गोष्टी सागर एकदम सहजरित्या करतो.

काकांच्या राजकीय सुरवातीपासूनच सागर काकांसोबत आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी दिसतो पण त्यांच्या मागे अविरत काम करणारी सागर सारखी माणसं महत्वाची असतात.

सागराची एनर्जी सकाळी सुद्धा तशीच असते आणि रात्री 12 वाजता सुद्धा तशीच असते. त्याला सततच्या कामामुळे कुटुंबियांना सुद्धा हवा तसा वेळ देता येत नाही, अशात पण सागरचे डेडिकेशन आणि काम करण्याची ऊर्जा कौतुकास्पद आहे.

सागर वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आई अंबाबाई निरोगी दीर्घायुष्य देवो आणि असेच काकांच्या सोबत सावलीसारखे काम करत राहा, हीच प्रार्थना!

- आ. ऋतुराज पाटील19 views0 comments

Comments


bottom of page