कुस्ती म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे कुस्ती! या परंपरेवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब केले ते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांनी. *खाशाबानी कुस्तीतून #ब्रँड_कोल्हापूर जगात पोहोचवला*. खाशाबांचे नाव आजही लोकांच्या मनामनात आहे. पण या कोल्हापुरी कर्तृत्वाचा सरकारी पातळीवर योग्य सन्मान झालेला नाही. त्यामुळेच, त्यांचा यावर्षी मरणोत्तर "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मान व्हावा अशी संपूर्ण कोल्हापूरकर आणि कुस्तीप्रेमींची भावना आहे. महाराष्ट्र सरकार आज केंद्राकडे नावे पाठवणार आहे. समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने माझी राज्य व केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी खाशाबा जाधव यांचा यथोचित गौरव करावा. खाशाबांच्या आसाठी आपणही सोशल मीडियावर #PadmaForKhashabaJadhav हा टॅग वापरून आपल्या भावना ट्विट करूयात.
चला, सर्वजण मिळून #ब्रँड_कोल्हापूर मोठा करूया..
- आ. ऋतुराज पाटील
Komentarze