Search

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आज कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची भेट घेऊन चर्चा केली.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आज कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी माझ्या ई- मेल वर पाठवलेल्या अडचणी मांडल्या. याबाबत खालील माहिती कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिली.

1. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे, त्यांनी तात्काळ आपल्या महाविद्यालयांना आज दुपारी 2 वाजेपर्यंत कळवावे. या माहिती आधारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येईल. याबाबचे परिपत्रक आज सकाळीच सर्व महाविद्यालयाना पाठवले आहे.

2. मुख्य परीक्षा ही पोक्टरड पद्धतीने होणार नाही, म्हणजेच वेबकॅमचा विकल्प अनिवार्य असणार नाही.

3. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे पासवर्ड आणि आयडी मिळालेले नाहीत, त्यांना पासवर्ड आणि आयडी दिले जात आहेत. यांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

- आ. ऋतुराज पाटील
1 view0 comments