Search

शिरोली, कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या 'सीमंधर कोविड केअर येथे काल पासून लसीकरण केंद्र सुरु...

शिरोली, कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या 'सीमंधर कोविड केअर येथे काल पासून लसीकरण केंद्र सुरु कार्यन्वित करण्यात आले. या केंद्रामुळे आसपासच्या औद्योगिक वसाहतींमधील हजारो कामगार बांधवाना लाभ होणार आहे.

शासनाने नियम व अटी घालून औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना परवानगी दिली असल्याने कोरोना काळातही कोल्हापूर परिसरातील हजारो कामगार बांधव शिरोली तसेच अन्य ठिकाणांच्या औद्योगिक वसाहतीत रोजगारासाठी जात असतात. या कामगार बांधवांचे लसीकरण करण्याच्या शासनाच्या सूचनेनुसार कामाच्या परिसरामध्ये लस उपलब्ध देण्याच्या उद्देशाने हे लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments