शंभर वर्षांपूर्वी वेदोक्त प्रकरणाच्या अनुभवातून राजर्षी शाहू महाराजांनी पाटगावचे संत मौनी महाराज यांच्या मठामध्ये क्षात्र जगद्गुरु पिठाची निर्मिती केली* होती. या ऐतिहासिक घटनेस येत्या 11 नोव्हेंबर रोजी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. या *शताब्दी वर्षा निमित्त सहयोग फाउंडेशन यांच्या वतीने शाहू जन्मस्थळ ते पाटगाव या 85 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज या रॅलीला झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भुदरगड, आजरा प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, वसंतराव मुळीक, मौनी विद्यापीठाचे विश्वस्त मधुकर देसाई, डॉ. प्रतापसिंह देसाई, नवज्योत देसाई, फत्तेसिंह सावंत,प्राचार्य डॉ. महादेव नरके, उद्योजक चंद्रकांत गोजारे, शक्ती सारंग, पोलीस अधिकारी स्वाती गायकवाड, सहयोग फाउंडेशन अध्यक्ष सुशांत माळवी, रोहित तांबेकर, मंगेश शिंत्रे, गौरव पाटील, धीरज भोसले प्रकाश माणगांवकर ,भांदिगरे सर आदी उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Commenti