top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

शहीद जवान कै. संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी आज डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे...

जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना कोल्हापूर दक्षिण मधील निगवे खालसा गावचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांना काही दिवसांपूर्वी वीरगती प्राप्त झाली. पाटील कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण कोल्हापूरकर उभे आहेत. शहीद जवान कै. संग्राम पाटील यांच्या अपुऱ्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी आज डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे रुपये ३ लाखांचा धनादेश पाटील कुटुंबियांना सोपविला.

याप्रसंगी करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील,अशोक किल्लेदार, टी.वाय.पाटील, शाहजी किल्लेदार, पी.एम.पाटील, एल.एस.किल्लेदार, जी.जी.पाटील, विलास कांजर, प्रवीण पाटील, संतोष किल्लेदार, संतोष ऱ्हाटोड, राहुल पाटील, संजय गुरव, गजानन पाटील, एकनाथ पाटील, डी.एस.ढगे आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



3 views0 comments

Comments


bottom of page