top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

विधानसभा निवडणूक होऊन बघता बघता आज एक वर्ष पूर्ण झाले सुद्धा....

कोल्हापूर दक्षिणच्या माझ्या बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,

विधानसभा निवडणूक होऊन बघता बघता आज एक वर्ष पूर्ण झाले सुद्धा. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला आपण सर्वांनी जो आशीर्वाद दिला, ज्या विश्वासाने मला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेबांनी सुरु केलेले विकासचक्र पुन्हा एकदा त्याच वेगात आणि त्याच जोमात पुढे घेऊन जाण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आणि यासाठी आपल्या सर्वांची आपुलकीची साथ मला मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो.

ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत आहे, याचे समाधान वाटते.

दरवर्षी ५ हजार झाडे लावण्याचा वृक्षारोपणाचा संकल्प यंदा आपण सूरु केला. तसेच मिशन रोजगारच्या माध्यमातून दक्षिणच्या युवक-युवतींसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे काम सुरू आहे.

कोल्हापूर दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षभराच्या काळातील जवळजवळ सात ते आठ महिने आपण कोरोनाशी लढा देत आहोत. राज्य सरकारने यासाठी जास्तीत जास्त निधी दिल्याने सर्वच लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्यासाठी निधी मिळताना बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नियोजनाप्रमाणे गेल्या वर्षभरात मतदारसंघात विकासाकामासाठी निधी देता आला नाही, हे वास्तव आहे. पण येणाऱ्या काळात कोरोनाचे संकट दूर होऊन आपण पुन्हा एकदा विकासपथावर नक्की मार्गक्रमण करू, असा मी आपल्याला विश्वास देतो.

आपण सर्वजण मला जे सहकार्य देत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे. आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी अविरत प्रयत्न करत राहीन, याची मी आपणांस खात्री देतो.

आपल्या प्रत्येकाच्या अडचणीची वैयक्तिक दखल घेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. याशिवाय शासकीय व प्रशासकीय पातळीवर देखील मतदारसंघातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेमामुळे कोल्हापूर दक्षिणच्या विकासाचे आपण सर्वांनी पाहिलेले स्वप्न आपण लवकरच सत्यात आणू, हा मला विश्वास आहे.

धन्यवाद!

आपलाच, ऋतुराज संजय पाटील



6 views0 comments

Comments


bottom of page