विजय पाटील म्हणजे आमच्या सर्वांचा लाडका विजूदा..
माझ्या लहानपणापासून अगदी सावलीप्रमाणे सोबत असणारा. अगदी माझ्यापासून ते माझा भाऊ पृथ्वी, तेजस, बहीण देवश्री या सर्वांना सांभाळणारा. आम्हाला शाळेला, ट्यूशनला सोडणे-आणणे, आम्हाला काय हवे, काय नको याकडे लक्ष ठेवणे, या सर्व गोष्टी विजूदा ने 30 वर्षे केल्या. आमच्यासाठी सकाळी लवकर घरी येऊन रात्री उशिरापर्यंत थांबताना त्याने कधीही तक्रार केली नाही.
आम्ही कितीही खट्याळपणा केला तरी सहन करणारा, प्रेमाने समजावून सांगणारा, आमचे लाड सुद्धा करणारा.. लहानपणा पासून अगदी कॉलेज जीवनापर्यंत कुठेही जायचे असेल तर' केअर टेकर' म्हणून आमच्या सोबत असणारा.. विजुदाने आम्हा भावंडांना दिलेली माया, प्रेम, आपुलकी अजूनही तशीच आहे. आम्हा सर्व भावंडांच्या जीवनात विजुदाचे वेगळे स्थान आहे आणि या पुढेही राहील!
आज विजुदा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. या वाढदिनी अगदी मनापासून शुभेच्छा ! आई अंबाबाई निरोगी दीर्घायुष्य देवो, हीच प्रार्थना..
- आ. ऋतुराज पाटील

Comments