गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोल्हापूर- सांगली जिल्ह्यात आलेल्या दुर्दैवी महापुरामुळे शेकडो गावांचे, शेतकरी-व्यापारी बांधवांचे तसेच सर्व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा, या बिकट परिस्थितीमध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब 'रिबिल्डींग कोल्हापूर' या माध्यमातून मदतकार्य करत होते. याचाच एक भाग म्हणून डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे 'वळिवडे' गावं दत्तक घेण्यात आले. गाव उभारणीसाठी लागणारे सर्वोतोपरी मदत डी. वाय. पाटील ग्रुप तर्फे करण्यात आली.
गेली अनेक वर्षे वळिवडे गावाचे आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे एक आपुलकीचे नातं आहे. आज या गावामधील नागरिकांशी गाठी-भेटी घेत असतांना पुरासारख्या संकटातून पुन्हा नव्याने उभे राहिल्याचे समाधान मला या सर्वांच्या डोळ्यात जाणवत होते.
आज अजून एक गोष्ट मला खूप काही शिकवून गेली, ती म्हणजे गावातील आमचे जेष्ठ सहकारी संपूर्ण दिवसभर एका तरुणाला लाजवेल या उत्साहाने माझ्या सोबत पूर्ण गावातून फिरत होते. वयाने जरी शरीर थकले तरी मनाने आयुष्यभर तरुण कसे राहायचे? हे आज माझ्या सर्व जेष्ठ सहकार्यांमुळे मला कळाले. तसेच, या दौऱ्यामध्ये मला मोलाची साथ लाभली ती म्हणजे माझ्या तरुण सहकाऱ्यांची. तरुणांची हीच ऊर्जा आणि जेष्ठांचा आशीर्वाद हेच आपले मिशन दक्षिणचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य कारणे होतील.
- ऋतुराज पाटील
Comments