आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील वडकशिवाले (ता. करवीर) आणि बाचणी (ता.कागल) या गावांदरम्यानच्या दूधगंगा नदीवरील नवीन पुलाचा भूमिपूजन आज ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब आणि खा. संजय मंडलिकजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच या गावांना जोडणारा जुना बंधारा पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद व्हायची. अशाने, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील खेबवडे, वडकशिवाले, इस्पुर्ली, नंदगाव या गावांचा कागल तालुक्याशी संपर्क तुटायचा. यामुळे, शेतकरी, व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागायचे.
आता दहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या नव्या पुलामुळे या प्रश्न कायमचा मिटणार आहे. हा पूल प्रत्येकी पाच गाळ्यांसह एकूण १०० मीटर लांबीचा असा सुसज्ज पूल उभारणी येणार आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments