कोरोना व संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कसबा बावडा आणि लाईन बाजार येथील नगरसेवक, श्रीराम सोसायटी संचालक, पत्रकार, जेष्ठ आणि तरुण कार्यकर्ते यांच्याशी गेली दोन दिवस विडिओ कॉन्फरन्स द्वारे स्वतंत्र बैठका घेऊन खबरदारी व उपायोजना संदर्भात सविस्तर चर्चा केली.
यावेळी, बावड्यातील कोरोना प्रादुर्भाव, तसेच संभाव्य पूर परिस्थितीशी कसा लढा द्यायचा,पुरबधितांचे स्थलांतर करण्यासाठी ठिकाणांचे नियोजन, औषध फवारणी या संदर्भात संवाद साधला. तसेच कोविड बद्दल जनजागृती, स्वाब संकलन, कोविड केअर सेन्टरची उभारणी याबद्दल सविस्तर चर्चा केली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments