आज कोल्हापुरातील रामानंदनगर येथील 'वसंतराव जाधव पार्क मधील ओपन स्पेसची जागा हस्तातरणचा लोकार्पण सोहळा' संपन्न झाला.
गेली कित्येक वर्षे प्रलंबित असणारा आणि थोडासा किचकट असणारा हा प्रश्न आज सर्वांच्या सामंजस्याने मार्गी लावला याचे मला समाधान वाटते. आजपर्यंत जाधव पार्क मधील सर्व नागरिक नेहमीच पाटील कुटुंबाच्या मागे ठामपणे उभी राहिले आहेत. पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांची निवडणूक असेल किंवा माझी निवडणूक असेल आपण सर्वांनी खुल्या दिलाने आम्हाला साथ दिली आहे. हा ओपन स्पेसचा प्रश्न सोडविण्याच्या मागणीला आपल्याला न्याय देता आला यांचा मला आनंद आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मी अगदी मनापासून कौतुक करतो. जागामालक श्री. शिरीष जाधव यांनीसुद्धा लोकांच्या मागणीला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो.
यामुळे अंदाजे १६ गुंठे जमीन ही आता पार्कसाठी उपलब्ध झाली आहे. याचा योग्य नियोजन करून भागातील सर्व नागरिकांना सोयीचे आणि अद्ययावत असे पार्क उभे करण्यासाठी आमदार म्हूणन माझे नेहमीच सहकार्य राहिले. आपण सर्वजण मिळून कोल्हापूरला सुंदर कोल्हापूर बनवूया.
यावेळी, शिरीष जाधव, विक्रम जाधव, सुनील पाटील, प्रमोद भोपळे, सुजित पाटील, दीपक जाधव, संतोष जरग, मोहन गावकर, शशिकांत पाटील, अनिल लोळगे, शिवाजी पाटील, अमित जाधव, सतीश कलोळी, सुजित पाटील, संदीप वाडकर, वैभव देसाई आणि इंडियन फ्रेंड्स सर्कलचे सर्व कार्यकर्ते आणि भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments