Search

राज्य शासनाच्या वतीने कोविड१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांसाठी ...

राज्य शासनाच्या वतीने कोविड१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांसाठी आज १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर केला.

यावेळी, प्रायोगिक तत्वावर रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, लसीची कमतरता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने सूचित केल्याप्रमाणे स्लॉट बुकिंग केल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये.

यावेळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विद्या पॉल, महेश छाब्रिया, प्रेम लालवाणी, गुडू सचदेव, धीरज टेहलाणी, सेवाराम तलरेना, सनी चंदवानी, प्रताब चंदवानी, शैलेश शिंदे, रोहन बुचडे, सुनील जेसवानी आदी उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments