कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनोच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी व आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसमवेत कोरोना परिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये जिल्ह्यातील कोरोनासह, म्युकरमायकोसिस प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता आदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी, संस्थात्मक अलगीकरणासाठी कसबा बावडा येथे सुरु केलेल्या अलगीकरण कक्ष तसेच नागरिकांच्या प्रबोधनासाठी 'गल्ली समिती' बाबत मा. उपमुख्यमंत्री व मा. आरोग्यमंत्री यांना दिली.
यासोबतच, म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनसाठी मागणी वाढली असून रुग्ण संख्येच्या अनुषंगाने इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती याला मा. उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Comments