‘राजर्षी शाहू फूड व्हॅन’ साठी डी. वाय. पाटील ग्रुपकडून गाडी भेट
- Nilesh Patil
- Apr 13, 2021
- 1 min read
कोल्हापूर शहरामध्ये विविध समारंभामधून वाया जाणारे अन्न सामाजिक भावनेतून गरीब व गरजवंत यांना पोहोचविणाऱ्या कोल्हापुरातील प्रशांत मंडलिक यांना 'राजर्षी शाहू फूड व्हॅन' या उपक्रमासाठी डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इको व्हॅन गाडी भेट देण्यात आली.
अन्न हे पुर्नब्रम्ह असून, शिल्लक णाची नासाडी रोखून ते योग्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम श्री. मंडलिक व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांच्या या कार्याचा अधिक विस्तर व्हावा या हेतूने ही व्हॅन डी.वाय. पाटील ग्रुपकडून भेट देण्यात आली.
- आ. ऋतुराज पाटील
Comments