राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान द्यावा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना "भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मान द्यावा, यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे ठराव करून पाठवावेत, अशी मागणी आज मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे डॉ. एन. डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासोबत केली. यावेळी, जलसंपदा मंत्री जयंत पाटीलजी उपस्थित होते.
