राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर स्मारकाच्या कामासंदर्भात राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ जतन व विकास समिती आणि पुरातत्वखात्याचे तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मा. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर स्मारकाच्या संवर्धनासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली नेमण्यात आलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ जतन व विकास समितीच्या निर्देशाखाली व आराखड्यानुसार राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ संवर्धनाचे उर्वरित काम करण्यात यावे, अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच, राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरवठा करणार असल्याचेही यावेळी मा. खा. संभाजीराजे छत्रपती तसेच आ. चंद्रकांत जाधव आणि माझ्याकडून सांगण्यात आले.
- आमदार ऋतुराज पाटील
Comentarios