top of page
Search

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचीदूरदृष्टी आणि वत्सलताआपल्याला कोल्हापुरात पाऊलोपावली पाहायला मिळते...

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि वत्सलता आपल्याला कोल्हापुरात पाऊलोपावली पाहायला मिळते. काल अशाच एका ठिकाणी भेट दिली. १९०६ साली महाराजांनी कोल्हापुरातील भटक्या जनावरांसाठी 'पांजरपोळ' ही संस्था सुरु केली.

तत्कालीन काळात भीषण दुष्काळ पडल्याने वृध्दत्वामुळे, अपघातामुळे कष्ट करण्यास असमर्थ असलेले बैल, भाकड झालेल्या गाई-म्हैशी यांची काळजी वाहण्यासाठी कायमस्वरुपी निवारा छावणी म्हणून शतकभरापूर्वी पांजरपोळ संस्थेची स्थापना केली.

या भटक्या जनावरांच्या संगोपनासाठी महाराजांनी सागरमाळावर चौसोपी रचना असलेली विस्तीर्ण इमारत बांधली, चारापाण्यासाठी शेकडो एकर जमीन संस्थेला दान दिली. तसेच औषध पाण्याच्या खर्चाचीही सोय केली. आजही इथे शेकडो जनावरे आश्रय घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत करण्याचे आवाहन मी केले होते याच पार्श्वभूमीवर काल राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पांजरपोळ संस्थेमधील जनावरांना पुरेसा चारा व कर्मचाऱ्यांसाठी मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी, संस्थेचे चेअरमन अरविंद वर्धमाने, सेक्रेटरी बाळासाहेब मनाडे, वसंतभाई शहा, रामणभाई पटेल, डॉ. राजकुमार बागुल, गोकुळ संचालक बयाजी शेळके, दलाजी वारके, गणपतराव वारके, राजेंद्र वारके,सौ. उमा वारके, महेश वारके, ऋतुराज वारके, सुलोचना नायकवडे, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.13 views0 comments
bottom of page