आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील मोरेवाडी येथील पदयात्रेला नागरिकांचे मिळणारे प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला भारावून सोडणारा आहे.
आम्ही कोल्हापूर दक्षिणमधील लोकांसमोर रोजगार केंद्रित असलेले आमचे व्हिजन घेऊन जात आहोत. जास्तीत जास्त युवक-युवतींना कोल्हापुरातच विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी IT हब, स्टार्टअपना प्रोत्साहन, आधुनिक ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून कोल्हापुरातील पारंपरिक उद्योगांना अपग्रेड करणे, अशा विविध माध्यमातून या रोजगाराच्या संधी कोल्हापुरात आपण निर्माण करणार आहोत.
हेच व्हिजन घेऊन मी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावांमध्ये/प्रभागांमध्ये जात आहे. याच दौऱ्याचा पुढचा टप्पा म्हणून मोरेवाडी येथे आज नागरिकांच्या भेटी घेतल्या.
- ऋतुराज पाटील
Comments