Search

'मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा" असे आवाहन करत ना. सतेज पाटील साहेब यांनी आज काँग्रेस कमिटी ....

'मी रक्तदान करतोय, तुम्ही पण करा" असे आवाहन करत ना. सतेज पाटील साहेब यांनी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराची सुरवात केली. या शिबिराला उत्स्फूर्त देत जवळपास 230 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

गेल्या एक दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्या मध्ये सध्या रक्त साठा कमी आहे. भविष्यात कुठेही रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी आज पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी आज काँग्रेस कमिटी येथे रकदान शिबिराचे आयोजन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या रक्तदान शिबिरासाठी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत ना. सतेज पाटील साहेबांच्या या सामाजिक उपक्रमाला पाठबळ दिले. येणाऱ्या काळात सुद्धा ना. सतेज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गरज पडेल तशी रक्तदान शिबिरे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्याचा आमचा मानस आहे.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments