माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हलसवडे गावातील 124 प्लॉटधारकांची नावे सातबारापत्रकी लावण्याबातचे प्रांताधिकार्यांचे पत्र ग्रामपंचायत पदाधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी यांच्याकडे सूपुर्द केले. यामुळे गेली 40 वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न मार्गी लागला आहे.
हालसवडे ग्रामपंचायतीला महसूल उत्पन्न मिळावे ,यासाठी गावठाण विस्तार योजनेअंतर्गत १९७९-८१ या कालावधीत १२४ गरजूंना ग्रामपंचायतीने दिड गुंठा या प्रमाणे प्लॉटचं वाटप केले होते. मात्र या प्लॉट धारकांची नावे गेली ४० वर्षे सात-बारा पत्रकी नोंद झाली नव्हती. पालकमंत्री सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लॉटधारकांची नावे सातबारा पत्रकी आता लावण्यात आला आहे. या प्लॉटधारकांची नावे सातबारापत्रकी लावण्याबातचे प्रांताधिकार्यांचे पत्र ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्याकडे सूपुर्द केले. अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे या प्लॉटधारकांच्या चेहऱ्यावरील समाधान सुखावणारे होते.
सामाजिक कार्यकर्ते मोहन खोचगे आणि तानाजी पाटील यांनी या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली. यावेळी, हालसवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच जगदीश साळोखे, शामगोंडा पाटील, तानाजी पाटील, मधुकर कांबळे, मोहन खचगे, मंडल अधिकारी अर्चना गुळवणी, तलाठी अविनाश कोंडीग्रेकर, बजरंग रणदिवे उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
Kommentare