महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा-कुणबी समाज्याच्या आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी स्वायत्त अधिकारावर स्थापन करण्यात आलेल्या 'सारथी' संस्थेच्या स्वायत्ततेसमोरच दि. ३ डिसेंबर २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरी, हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात यावेत. तसेच, ओ. बी. सी., व्ही. जे. एन. टी. वर्गासाठीच्या सक्षमीकरणासाठी महाज्योती संस्थेमार्फत मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान स्पर्धा परीक्षांसाठीचे शिकवणीवर्ग घेतले जातात, पण अद्याप अजूनही या संस्थेसाठी कोणत्याही प्रकारचा आवश्यक निधी, मनुष्यबळ तसेच कार्यालय उपलब्ध झालेले नसून त्याचीही पूर्तता करण्याचे आदेश देण्याची विनंती आज मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन करण्यात आली. यावेळी, ना. आदित्य ठाकरे, आ. रोहित पवार, आ. जिशन सिद्दकी, आ. योगेश कदम, आ. अतुल बेनके उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*

Comments