कसबा बावडा येथे आम्ही सुरू केलेल्या 'बावडा रेस्क्यू फोर्स' मधील सर्पमित्रांशी आज हॉस्पिटलमधून झूम मीटिंगच्या माध्यमातून संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा साप असेल तर तो पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम हे सर्वजण अत्यंत धाडसाने करत आहेत. या सर्व सर्पमित्रांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना स्टिक, स्टील पाईप, बॅग, बॅटरी तसेच शूज, ग्लोव्हज हे साहित्य आज दिले. नक्कीच बावडा रेस्क्यूचे हे सर्पमित्र सदस्य आपले काम नेटाने पुढे सुरू ठेवतील.
आजच्या मीटिंग वेळी रेस्क्यू फोर्सचे समन्वयक मानसिंग जाधव, तानाजी चव्हाण, प्राचार्य डॉ. महादेव नरके, हेमंत उलपे यांच्यासह सर्पमित्र अशांत मोरे, निलेश पिसाळ, चेतन बिरंजे, सुजित जाधव, अक्षय निकम, टोनी घाटगे, सतीश गायकवाड, शुभम कांबळे, सौरभ कांबळे, सुजित पिसाळ उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील
Comments