'ब्रेक द चेन'च्या नवीन नियमावली तसेच कोल्हापूर जिल्हयातील कोरोना उपाययोजनांबाबत आज आ. जयंत आसगावकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.
कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जनजागृतीवर भर देऊ या. 'ब्रेक द चेन' मधील नियमांबाबत छोटे व्यावसायिक आणि नागरिक यांचे आर्थिक चक्र सुरु राहण्यासंदर्भातील भावना लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही शासनाकडे पोहचविणार आहोत. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांनी राज्याचे मुख्य सचिवांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये छोट्या व्यावसायिकांच्या समस्या मांडाव्या अशी मागणी यावेळी मा. जिल्हाधिकारी यांना केली.
गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात छोटे व्यावसायिक, रोजंदारी करणारे लोक यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. नव्या वर्षात सर्व गोष्टी मार्गावर लागत आहे असे वाटत असतानाच कोरोनाने पुन्हा तोंड वर काढले आहे. नव्या नियमांसंदर्भात अनेक छोट्या व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहचविणार आहोत. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये जास्तीत जास्त प्रबोधन करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या बैठकीला, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, अशपाक आजरेकर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments