top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

पालकमंत्री ना. सतेज डी. पाटील साहेब यांच्या 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' अंतर्गत कोल्हापुरातील.....

पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' अंतर्गत कोल्हापुरातील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या पार्श्वभूमीवर शिरोली एमआयडीसी येथे shiroli manufacturers association (स्मॅकच्या ) पदाधिकारी आणि संचालक यांच्यासोबत बैठक आयोजित करून कोल्हापुरातील उद्योगधंद्यातील समस्या व भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी याबाबत सविस्तर चर्चा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीत काम करणारे 20 हजारांहुन कामगार परराज्यात आपापल्या घरी गेल्याने मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.पण यामुळे न थांबता उद्योगाचे चक्र सुरु ठेवावे लागणार आहे. 'माझं कोल्हापूर, माझा रोजगार' अंतर्गत आजअखेर 15 हजाराहून अधिक स्थानिक लोकांनी नोकरीसाठी बायोडाटा पाठवला आहे. त्याचे वर्गीकरण करून योग्य नोकरी साठी प्रयत्न सुरू आहेत. उद्योजकांनी या भुमितपुत्रांना रोजगार देण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांना केली. आपण सर्वजण मिळून कोल्हापूरच्या विकासाला हातभार लावूया असे आवाहन करून लोकप्रतिनिधी म्हणून लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांना दिली.

उद्योजकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या सर्वांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. उद्योगाला उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांनी केलेल्या मागण्यांचा मी नक्की पाठपुरावा करणार आहे. यावेळी, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, स्मॅकचे उपाध्यक्ष दिपक पाटील, नीरज झंवर, जयदीप चौगले,सोहन शिरगावकर , एम.वाय.पाटील , राजू पाटील, अमर जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव यांच्यासह प्राचार्य डॉ.महादेव नरके, शशांक मोरे, मकरंद काइंगडे आदी उपस्थित होते. - आ. ऋतुराज पाटील4 views0 comments

Comments


bottom of page