प्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.. आजचा दिवस हा डॉ. बी. सी. रॉयजी यांचा जन्म आणि स्मृतिदिन. त्यांच्या वैदयकीय व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
डॉक्टर्स म्हणजे समाजाचे आरोग्य जपणारी व्यक्ती. माणूस जेवढा देवावर श्रद्धा ठेवतो तेवढा विश्वास हा डॉक्टरांवर ठेवतो. आजपर्यंत आपण सर्वांनी हा विश्वास जपला आहे. हे सेवेचे व्रत आपण सर्वजण अखंडपणे जोपासले आहे.
जीवाची पर्वा न करता गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या या संकटाशी लढताना आपण सर्वजण करत असलेल्या कार्याला सलाम. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने सर्व डॉक्टरांना व त्यांच्या सहकाऱ्यांना चांगली ऊर्जा व दीर्घायुष्य मिळो, हीच करवीर निवासिनी आई अंबाबाई चरणी प्रार्थना. आपण स्विकारलेले वैद्यकीय सेवेचे व्रत असेच अखंडपणे सुरू राहो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना डॉक्टर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
Comments