कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पाचगाव येथे ३५ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या साकव पुलाचे उदघाटन करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे पावसाळ्यामध्ये पाचगांव येथील मगदूम कॉलनी भागातील लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन लोकांना अडचणी सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी साकव उभा करण्याचे नियोजन केले. अत्यंत कमी काळामध्ये हे काम सुद्धा चांगल्या दर्जाचे होऊ पूर्ण होत आले आहे, याचे समाधान वाटते.
गेल्या दीड वर्षापूर्वी कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर आले. त्यामुळे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा या संकटामुळे विकासकामांचा आमदार निधी आरोग्याच्या यंत्रणेसाठी, साहित्य खरेदीसाठी पैसे खर्च करत असल्याने विकासकामांसाठी निधी खर्च करण्यासाठी फारसा निधी उपलब्ध होत नाहीये.
त्यामुळे, लोकप्रतिनिधी असूनही ज्या वेगाने विकासकामे करण्याचे नियोजन केले होते त्याला या कोरोना संकटामुळे थोडा ब्रेक लागला आहे. तरीसुद्धा आमदार म्हणून मिळणाऱ्या निधीतून अँब्युलन्स खरेदी, वेंटिलेटर, औषधे यासारख्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री सतेज बंटी पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रशासनासोबत काम करून या संकटासाठी लढत आहोत, आणि मला खात्री आहे आपण लवकरच यावर मात करू.
यावेळी, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच अश्विनी किरण चिले, नारायण गाडगीळ, संजय पाटील, राधिका खडके, सुशांत शेटगे, प्रकाश गाडगीळ, संदीप गाडगीळ, संग्राम पोवाळकर, प्रवीण कुंभार, शिवाजी दळवी, प्रवीण देसाई, बाळासाहेब सोनुले, अशोक निंगुरे आदी उपस्थित होते.
Comments