पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दुधाळी एसटीपी प्रकल्प, पंचगंगा नदी राबाडे पंप, जयंती पंपिंग स्टेशन आणि कसबा बावडा एसटीपी प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पंचगंगा नदी प्रदूषणावर योग्य उपाय योजना करण्यासाठी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते आणि आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, दिलीप देसाई यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसोबत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आढावा बैठक घेतली. तसेच, पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, महिला आणि बाल कल्याण सभापती शोभा कवाळे, परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, नगरसेवक डॉ संदीप नेजदार, राहुल माने, जय पटकारे, प्रा अशोक जाधव, नगरसेविका माधुरी लाड, वनिता देठे, स्वाती येवलुजे, दिलीप देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमीं उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Commenti