परवानाधारक रिक्षाचालकांचे अनुदान थेट बँकेत जमा होणार
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना रु. १५००/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी व मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी 'आयसीआयसीआय' बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, लायसन्स आणि आधार क्रमांकाची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर भरायची आहे. संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येईल.
अर्ज करण्यासाठीची लिंक:
अर्जाची वेळ: सकाळी 8 ते रात्री 10
टीप: आपल्या परिचयातील सर्व रिक्षाचालक बांधवांना सदर माहिती पोहचवावी, ही नम्र विनंती.
- ना.सतेज (बंटी) डी. पाटील परिवहन राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य

Comments