top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

नैसर्गिकसंकटे आणि अपघातांच्या दरम्यान मदत करण्यासाठी सुरुकेलेल्या बावडा रेस्क्यूफोर्सचे स्नेहसंमेलन

कोल्हापुरातील नागरिकांना नैसर्गिक संकटे आणि अपघातांच्या दरम्यान मदत करण्यासाठी सुरु केलेल्या बावडा रेस्क्यू फोर्सचे स्नेहसंमेलन आज संपन्न झाले.

काही नैसर्गिक संकटे किंवा अपघात यावेळी लोकांची परिस्थिती ही अत्यंत अडचणीची होते. संकटात सापडलेले हे लोक काही करू शकत नसल्याने हतबल झालेले असतात. अशा वेळी जर त्यांना कोणी मदतीचा हात दिला, तर ते त्या लोकांसाठी फार महत्वाचे ठरते. मदत करणारे हे लोक त्यांच्यासाठी देवदूत असल्यासारखे असतात. आणि बावडा रेस्क्यू फोर्सने देवदूता प्रमाणे लोकांना मदत करण्यासाठी उचललेले हे पाऊल कसबा बावड्याची शान वाढवणारे आहे.

गेल्या 2 वर्षांपूर्वी पुरामुळे संपूर्ण कोल्हापूरात अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी रहिवाशी भागात पुराचे पाणी घुसले होते. बावड्यातील लाईन बाजार आणि अन्य भागातही पुरामुळे लोकांना घराबाहेर पडता आले नव्हते. या वेळी आदरणीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी मिळून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. या काळात आलेले अनुभव मनाला वेदना देणारे होते. प्रशासनाच्या माध्यमातून त्या काळात लोकांना मदत करन्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याला मर्यादा होत्या. अशा काळात बावडा रेस्क्यू फोर्स सारख्या NGO चे काम हे लोकांना जीवदान देणारे ठरते.

आपल्या बावड्यातील आपण सर्वांनी अगदी मनापासून पुढे येत BRF ची स्थापना केली. आजपर्यंत आपल्या ग्रुपमधील सर्पमित्रांनी कोणाचाही फोन येताच लगेच त्या ठिकाणी जाऊन साप पकडले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सापांना जीवदान देऊन सुरक्षित ठिकाणी सोडले. एकीकडे लोकांना मदत करताना दुसरीकडे सापांना वाचवून निसर्गाची साखळी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या बरोबर राजाराम बंधारा या ठिकाणी केलेले मदतकार्य सुदधा कौतुकास्पद आहे.

हे सर्व करत असतांना फोर्सच्या सदस्यांनी स्वतःची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. कारण आपल्यावर आपल्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते. याचा विचार करूनच सर्पमित्रांना आपण saftey kit दिले आहेत. राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते सुद्धा स्वछता मोहीम आणि सर्व सामाजिक कार्यात सक्रिय असतात. वृक्षप्रेमी ग्रुपने पॅव्हेलिएन ग्राउंड वरील झाडांची निगा ठेवण्याचे काम नेहमीच केले आहे.

यापुढील काळातही आपण सर्वांनी योग्य नियोजन करून BRF चे काम पुढे न्यावे .त्यासाठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून नक्की होईल, असा विश्वास यानिमित्ताने बावडा रेस्क्यू फोर्स टीमला दिला.

- आ. ऋतुराज पाटील
3 views0 comments

Comments


bottom of page