आज नगरसेविका रिना कांबळे यांच्या प्रभाग क्रमांक ७३ फुलेवाडी रिंगरोड प्रभागातील विविध विकास कामाच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक ७३ मधील शेळके कॉलनी, भोगम पार्क, गजानन-सोनाई नगर, जोतिर्लिंग कॉलनी, मनोहर कोतवाल नगर, अहिल्याबाई होळकर नगर आणि राजे संभाजी कॉलनी आदी ठिकाणचे रस्ते गटर अशा एकूण सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची विकास कामे या प्रभागामध्ये सुरु आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उपनगरामध्ये जी विविध विकास कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत, ती लवकरच पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, नगरसेविका रिना कांबळे, किरण पाटील, मंगेश गुरव, धनंजय बोगांळे, बाजीराव कांबळे, अर्जुन पाटील, विशाल पाटील, महादेव भोसले, सी बी पाटील, राणिताई तेजवाणी, गीता गंभीरे, बाबुराव बोडके, राहुल शिंदे, सदाशिव कांबळे, संजय गावडे, मीना सुतार, पोपट मुसळे, रेखा पवार, सुनील पुंगावकर यांच्यासह प्रभागातील जेष्ठ नागरिक, बचत गटाच्या महिला, तरून मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Commenti