Search
  • Nilesh Patil

दै. सकाळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित RPL 2021 लीगचे उदघाटन करण्यात आले.

आज दै. सकाळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित RPL 2021 लीगचे उदघाटन करण्यात आले.

गेली सात वर्षे रोटरी सेंट्रल तर्फे या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. याबद्दल रोटरी सेंट्रलच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे यांचे मनापासून अभिनंदन. तसेच, दै. सकाळने या स्पर्धेला खुप मोठे पाठबळ दिल्याबद्दल सकाळचे मनापासून आभार.

मी स्वतः एक खेळाडू असल्याने खेळाचे आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे हे मी जाणतो. खेळामुळे टीम वर्कची आपल्याला सवय होते, जय-पराजय खिळाडूंवृत्तीने आपण स्वीकारू शकतो.सध्या सगळ्या लोकांमध्ये फिटनेस बाबत जागृतता वाढत आहे.

दै. सकाळने आजपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांना पाठबळ दिले आहे. समाजात जे चांगलं घडत ते लोकांसमोर ताकदीने मांडणे, चांगल्या गोष्टीना पाठबळ करणे ही सकाळ ची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.

यावेळी, सकाळ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कोल्हापूर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, संग्राम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सूर्यकांत पाटील, सत्यजित पाटील, निवासी संपादक निखिल पंडितराव तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999