Search

दै.पुढारीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कोल्हापूर शहरातील दिव्यांग तसेच अंध...

आज दै.पुढारीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कोल्हापूर शहरातील दिव्यांग तसेच अंध बंधू - भगिनी यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. या मोहिमेला नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड शाखा कोल्हापूर येथे प्रारंभ करण्यात आला. कोरोना संकट काळात दिव्यांग आणि अंध बंधू-भगिनी यांच्यासाठी ही विशेष मोहीम नक्कीच महत्वाची आहे. आजपर्यंत दै.पुढारी ने समाज हिताचे अनेक उप्रकम राबविले आहेत .आजची मोहीम राबवून पुढारीने सामाजिक बांधिलकी अजून घट्ट केली आहे.

यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, पुढारीचे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, बाळ पाटणकर, राजेंद्र मांडवकर,डॉ.संदीप पाटील,माजी उपमहापौर संजय मोहिते, नॅशनल असोसीएशन ऑफ ब्लाइंड कोल्हापूरचे अध्यक्ष मुरलीधर डोंगरे, ,शिवानंद चिले, सुनील नागराळे, उपायुक्त निखिल मोरे, रवी आडसुळ ,अमर समर्थ यांच्यासह पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.1 view0 comments