'दीपसंध्या-२०१९' एक संध्याकाळ,दीप उत्सवाची...
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त खास महिलांसाठी साजरा होणारा 'दीपसंध्या' कार्यक्रम, यंदा जयमल्हार फेम अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दरवर्षीं त्रिपुरारी पोर्णिमेनिम्मित आयोजित या कार्यक्रमात कसबा बावडा येथील पंचगंगा घाट हजारो दिव्यांनी उजळून दिला जातो.
यावेळी, सौ. प्रतिमा सतेज पाटील, सौ. संयोगीताराजे छत्रपती, सौ. जयश्री चंद्रकांत जाधव, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, तसेच श्रीराम सोसायटी सभापती, उपसभापती, सर्व संचालिका व संचालक व सर्व नगरसेविका,नगरसेवक तसेच महिलांच्या अफाट गर्दीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
Comments