top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यावतीने एव्हरेस्ट शिखर मोहीमेवर असणाऱ्या कस्तुरी सावेकरला एक लाखांची मदत

डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यावतीने एव्हरेस्ट शिखर मोहीमेवर असणाऱ्या कस्तुरी सावेकरला एक लाखांची मदत

कोल्हापुरातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहीका कस्तुरी सावेकर ही सध्या एव्हरेस्ट शिखर मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यावर आहे. या मोहीमेसाठी येणारा खर्च लक्षात घेता, डॉ.डी.वाय पाटील ग्रुपच्यावतीने अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील साहेब, पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपूर्त केला.

कस्तुरी सावेकर ही सध्या माऊंट एव्हरेस्ट मोहीमेच्या अंतीम टप्प्यात आहे. या मोहिमेसाठी अंदाजे 42 लाख रुपयांचा खर्च असून, ही मोहीम पुर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन सावेकर कुटूंबियांकडून करण्यात आले होते. कोल्हापुरच्या या रणरागिणीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आज डॉ डी वाय पाटील ग्रुपच्यावतीने ही छोटीशी मदत करण्यात आली.

जगातील सर्वोच्च शिखर असणार्या माऊंट एव्हरेस्ट वर भारताचा तिरंगा फडकावत कस्तुरी कोल्हापूरचे नाव सर्वदूर पोहचवेल असा विश्वास असून कस्तुरीला या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोल्हापूर जिल्हा माऊंटेनरींग असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ विश्वनाथ भोसले , जनसंपर्क अधिकारी डी डी पाटील, प्राचार्य डॉ.महादेव नरके उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील4 views0 comments

Yorumlar


bottom of page